विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर नारायण राणेंचा दोनदा पराभव झाला. एकदा तर बाईनं पाडलं, असं विधान केलं होतं. त्यावर राणे यांनी आज कोल्हापुरात प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला आहे. ‘अजितदादाला (Ajit Pawar) बारामतीबाहेर राजकारण कितपत कळतं, हे मला माहिती नाही. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. ते ज्या प्रकारचे राजकारणी आहेत, त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर पडून त्यांनी दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या भानगडीत पडू नये. माझ्या फंद्यात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन बारा वाजवीन,’ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी अजित पवार यांना दिला.
#ajitpawar #narayanrane #bjp #ncp #baramati #maharashtra #shivsena #hwnewsmarathi